

Pune Fire Safety Rules 447 Establishments Get Notices for Violations and Eight Days to Upgrade Fire Safety Systems
sakal
पुणे : शहरातील अग्निसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांची महापालिकेकडून तपासणी सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यानुसार संबंधित आस्थापनांना अग्निशमन सेवा शुल्क व वार्षिक शुल्क दंड आकारला जाणार आहे. शहरातील ४४७ आस्थापनांची तपासणी केली असून, नियमांचे पालन न केल्याबद्दल त्यांना नोटिसा बजावल्या आहेत.