Pune News : ऑस्ट्रेलियन महिलेचे पुण्यात अवयवदान, पहिल्यांदाच परदेशी दात्याचे अवयव प्रत्यारोपण; चौघांना जीवनदान

First Foreigner Organ Donation in Pune : दिवाळीसाठी लोणावळ्याला आलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिकत्व असलेल्या ४६ वर्षीय भारतीय वंशाच्या परदेशी महिलेचे पुण्यात प्रथमच अवयवदान झाले असून, तिच्या अवयवांचे प्रत्यारोपण करून चार रुग्णांना जीवनदान मिळाले; मात्र, ऑस्ट्रेलियन दूतावासाची परवानगी मिळवणे हे एक मोठे आव्हान ठरले.
First Foreigner Organ Donation in Pune

First Foreigner Organ Donation in Pune

Sakal

Updated on

पुणे : पुण्यात प्रथमच परदेशी महिलेचे अवयवदान झाले. तिच्या अवयवदानातून चार रुग्णांना जीवनदान मिळाले. भारतीय वंशाची मात्र ऑस्ट्रेलियन नागरिक असलेल्या ४६ वर्षीय महिला मेलबर्न येथे राहत होती. ती दिवाळीसाठी लोणावळा येथे कुटुंबीयांसह आली होती. हे अवयवदान तीन नोव्हेंबरला झाले. पुण्यात प्रथमच एका परदेशी नागरिकाकडून अवयवदानाची घटना नोंदवली गेली असल्याची माहिती पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती (झेडटीसीसी)च्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com