पुणेकरांनी टिकेची झोड उठविल्यावर स्मार्ट सिटीचे मानांकन अखेर उंचावले !

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 August 2020

देशातील 100 स्मार्ट सिटी प्रकल्पांवर केंद्र सरकारकडून नियमित देखरेख ठेवली जाते. मिळालेला निधी, केलेला खर्च आदींवर केंद्र सरकारकडून मानांकन ठरविले जाते. 21 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध मानांकनात पुणे शहराचा क्रमांक 28 व्या क्रमांकावर गेला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच शहरातील विविध संस्था व स्वयंसेवी संस्थांनी महापालिकेच्या अंतर्गत झालेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनवर टिकेची झोड उठविली होती.

पुणे : स्मार्ट सिटीचे मानांकन घसरल्यावर पुणेकरांनी टिकेची झोड उठविल्यावर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर झालेल्या प्रशासकीय सुधारणांमुळे स्मार्ट सिटी प्रकल्पात पुण्याचा क्रमांक 28 वरून 15 व्या क्रमांकावर पोचला आहे. त्यामुळे पुणे हे राज्यात अव्वल शहर ठरले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशातील 100 स्मार्ट सिटी प्रकल्पांवर केंद्र सरकारकडून नियमित देखरेख ठेवली जाते. मिळालेला निधी, केलेला खर्च आदींवर केंद्र सरकारकडून मानांकन ठरविले जाते. 21 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध मानांकनात पुणे शहराचा क्रमांक 28 व्या क्रमांकावर गेला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच शहरातील विविध संस्था व स्वयंसेवी संस्थांनी महापालिकेच्या अंतर्गत झालेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनवर टिकेची झोड उठविली होती. स्मार्ट सिटी प्रशासनाने केलेल्या कामांच्या नोंदी केंद्र सरकारकडे वेळेत पोचविल्या नव्हत्या, त्यामुळे पुणे शहराचे मानांकन घसरले होते. त्यामुळे दोन अधिकाऱ्यांना स्मार्ट सिटीने कामावरून कमी करून नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. या पार्श्‍वभूमीवर गेल्या पाच दिवसांत नोंदी "अपडेट' करण्याचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले. परिणामी शहराचे मानांकन उंचावले आहे.

सुधारित मानांकनाबद्दल समाधान व्यक्त करून महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, "नियोजित प्रकल्प राबविण्याबरोबरच पुणे स्मार्ट सिटीने लॉकडाऊनच्या कालावधीतही करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये पुढाकार घेतला आणि कमांड अँड कंट्रोल सेंटरचा वॉर रूम म्हणून अत्यंत प्रभावीपणे उपयोग केला आहे. तसेच प्रगतिपथावर असलेल्या प्रकल्पांमुळे स्मार्ट सिटी मिशनमधील पुणे शहराचे स्थान आणखी उंचावेल असा विश्वास आहे.''

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 

स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या, "लॉकडाऊनपूर्वी सुरू केलेली कामे निरंतर सुरू आहेत. त्याशिवाय करोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने पुणे स्मार्ट सिटीने नवे डिजिटल उपक्रम सुरू केले आहेत. तसेच, स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून वॉर रूमद्वारे पुणे स्मार्ट सिटी सर्वतोपरी योगदान देत आहे. यामुळे स्मार्ट सिटीची कामगिरी निश्‍चितच उंचावली आहे.''

प्रकल्पांच्या सद्यस्थितीची अद्ययावत माहिती केंद्र शासनाच्या प्रणालीमध्ये "ऑनलाईन अपडेट' करण्यात आली आहे. यामुळे कामगिरीच्या अनुषंगाने पुणे स्मार्ट सिटीचे क्रमवारीतील स्थान तथा मानांकन उंचावले आहे. पुण्याने राष्ट्रीय क्रमवारीत 28 वरून थेट 15 व्या स्थानावर झेप घेतली आहे. लॉकडाऊनपूर्वी पुणे 17 व्या क्रमांकावर होते तर मधल्या काळात 28 व्या क्रमांकावर पोचले होते.

 

महाराष्ट्रातील शहरांचे राष्ट्रीय स्तरावरील मानांकन
पुणे- 15, नाशिक- 16 , नागपूर- 42 , सोलापूर- 44, ठाणे- 55 , पिंपरी चिंचवड- 61 , कल्याण डोंबिवली- 62, औरंगाबाद- 67

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune is first in the state and 15th in the country for Smart City work