गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी पाच दिवस परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sound system

गणेशोत्सवादरम्यान चार ऐवजी पाच दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली.

गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी पाच दिवस परवानगी

पुणे - सार्वजनिक गणेश मंडळांना ध्वनी प्रदूषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान चार ऐवजी पाच दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

पुण्यातील सार्वजनिक गणपतींचे देखावे व आरास पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास चार ऐवजी पाच दिवस परवानगी देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे दौऱ्यादरम्यान दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

गणेशोत्सवात शनिवार, ३ सप्टेंबर, रविवार, ४ सप्टेंबर, मंगळवार ६ सप्टेंबर, बुधवार, ८ सप्टेंबर आणि शुक्रवार, ९ सप्टेंबर या कालावधीत पाच दिवस नियमांचे पालन करून ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा रात्री १२ वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Pune Five Days Permission For Use Of Loudspeakers During Ganeshotsav

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneGaneshotsav