esakal | पुणे : ललित कला केंद्रात आता पाच वर्षाचा अभ्यासक्रम IPune
sakal

बोलून बातमी शोधा

Pune University

पुणे : ललित कला केंद्रात आता पाच वर्षाचा अभ्यासक्रम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात आता पाच वर्षाचा एम.ए. एकात्मिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर सूरू झालेल्या या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळेल. त्याचबरोबर गुरूच्या सानिध्यात अधिक काळ शिकण्याची संधी मिळेल, अशी माहिती विभागाचे प्राध्यापक डॉ. चैतन्य कुंटे यांनी दिली आहे.

हेही वाचा: वारंवार रस्ते कसे अडवले जाऊ शकतात? SCचा केंद्राला सवाल

२०२१-२२ या शैक्षणिक वर्षात हा अभ्यासक्रम सुरू झाला असून, बारावीनंतर विद्यार्थ्याने चार वर्षाचे शिक्षण घेतल्यास पदवी आणि पुढील एक वर्षे अधिक शिकल्यास पदव्युत्तर शिक्षणाचे प्रमाणपत्र मिळणार आहे. मागील वर्षी पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम चालू राहणार आहे, असेही डॉ. कुंटे यांनी सांगितले. यावर्षी ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे.

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये ः

  • दोन वर्षासाठी पदविका, चार वर्षासाठी पदवी आणि पाच वर्षासाठी पदव्युत्तर प्रमाणपत्र

  • मल्टीटाईम एन्ट्री आणि एक्झिटची सुविधा

  • चौथ्या वर्षाला प्रस्तुतीकरणातील संशोधन किंवा व्यावसायात कार्यानुभव

  • कलेच्या सादरीकरणाबरोबरच व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर

  • गुरूच्या सानिध्यात दीर्घकाळ शिकण्याची संधी

प्रवेश क्षमता ः

विद्यापीठाच्या नियमित प्रक्रियेद्वारे यंदाचे प्रवेश झाले आहे. संगीत, नृत्य आणि अभिनयासाठी प्रत्येकी १५ अशा एकूण ४५ विद्यार्थ्यांना प्रवेश प्राप्त मिळाला आहे. बारावीनंतर विद्यार्थ्याला विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेद्वारे अभ्यासक्रमात समाविष्ट होता येईल.

"ललित कला केंद्र अगदी सुरवातीपासूनच प्रत्यक्ष सादरीकरण आणि व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर देत आहे. एम.ए.च्या एकात्मिक अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना मल्टिपल एक्झिट आणि एन्ट्रीची सुविधा मिळणार आहे. तसेच गुरूच्या सानिध्यात दीर्घकाळ शिकण्याचीसंधीही हा अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहे."

- डॉ. चैतन्य कुंटे, प्राध्यापक, ललित कला केंद्र

loading image
go to top