esakal | Pune: फ्लॅटच्या खरेदीमध्ये फसवणूक केल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पुणे : फ्लॅटच्या खरेदीमध्ये फसवणूक केल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
रवींद्र पाटे

नारायणगाव : फ्लॅटच्या खरेदीखतापोटी सोळा लाख रुपयांची रक्कम घेऊन फ्लॅटचा ताबा न देता महिलेची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी गणराज इंटरप्राजेसचे भागीदार व मध्यस्थ आशा चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक विलास देशपांडे यांनी दिली.

या प्रकरणी मध्यस्थ उमेश नामदेव इचके(राहणार नागापूर, ता.आंबेगाव), गणराज इंटरप्राजेसचे भागीदार भाऊसाहेब बंडू पाटील (राहणार गिरवली, ता.आंबेगाव), संतोष दत्तात्रय वाघ ( राहणार रांजणी, ता.आंबेगाव), विशाखा संजय जाधव ( राहणार जाधववाडी,तालुका आंबेगाव ) यांचेवर गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत पोलिस निरीक्षक देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुनम राहुल माचरेकर (वय २७ , राहणार थोरांदळे, तालुका आंबेगाव) यांनी उमेश इचके यांच्या मध्यस्थीने गणराज इंटरप्राजेसच्या नारायणगाव येथील ओमसाई अपार्टमेंट मधील फ्लॅट नंबर १२ ही सदनिका सन २०१८ साली सोळा लाख रुपयांना खरेदी केली होती. करारनाम्यानुसार दोन महिन्यात फ्लॅटचा ताबा देण्याचे ठरले होते. मात्र आरोपींनी फ्लॅटचा ताबा देण्यास चालढकल केली.त्या मुळे माचरेकर यांनी आरोपींकडे सोळा लाख रुपये देण्याची मागणी केली.त्या नंतर आरोपी भाऊसाहेब पाटील यांनी ओम साई अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर बारा ऐवजी फ्लॅट नंबर आठ च्या व्यवहाराचा संपूर्ण मोबदला मी तुम्हाला परत करील असे स्टॅम्प पेपरवर चुकीचे लिहून दिले.या बाबत माचरेकर यांनी विचारणा केली असता भाऊसाहेब पाटील यांनी माचरेकर यांच्यासह त्यांचा भाऊ, आई यांना मारहाण केली.या प्रकरणी पुनम माचरेकर यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार गणराज इंटरप्राजेसचे भागीदार व मध्यस्थ आशा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top