

Shrinath Bhimale Tops Pune City Defacement List as Municipal Corporations Remove Illegal Flex Banners Under New Campaign
sakal
पुणे : वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छांचा वर्षाव होण्याऐवजी स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना शहर विद्रूपीकरणाचा बहुमान मिळाला आहे. पुणे महापालिकेच्या ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिमेत शहरात सर्वाधिक अनधिकृत जाहिरात फलक लावल्याच्या तक्रारींमध्ये भिमाले यांच्यावर विद्रोपीकरणाचा ठपका ठेवला आहे. यात त्यांचा पहिला क्रमांक पटकाविला आला . विशेष म्हणजे, वाढदिवशीच हा नको असलेला बहुमान मिळाल्याने राजकीय वर्तुळात त्याची चर्चा रंगली आहे.