

Viral Video Pune Khadakwasla Dam Releases 20779 Cusecs Mutha River Residents Asked to Stay Alert
sakal
-राजेंद्रकृष्ण कापसे
खडकवासला : मुठा नदीकाठच्या नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा! खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तीनही धरणे १०० टक्के भरली असून टेमघर धरणाचा पाणीसाठा ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील विसर्गात टप्प्याटप्प्याने मोठी वाढ करण्यात येत आहे. खडकवासला धरणातून शनिवारी सायंकाळी ८५६ क्युसेक असलेला विसर्ग रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत वाढवून २०,७७९ क्युसेक करण्यात आला असून पानशेत आणि वरसगाव धरणांच्या सांडव्यावरील विसर्गातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुठा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.