पुणे : समाविष्ट गावातील ओढ्यांना पावसाळ्यात पुराचा धोका अटळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

odha

समाविष्ट गावातील ओढ्यांची स्वच्छता न केल्यामुळे पावसाळ्यात पुराचा धोका अटळ आहे.

पुणे : समाविष्ट गावातील ओढ्यांना पावसाळ्यात पुराचा धोका अटळ

उंड्री - समाविष्ट गावातील ओढ्यांची स्वच्छता न केल्यामुळे पावसाळ्यात पुराचा धोका अटळ आहे. मागिल वर्षी उंड्रीतील ओढ्याच्या पुरात कार वाहून जाताना कारसह चालकाचा नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीव वाचला होता. ओढ्यालगतच्या घरात पाणी शिरल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागला होता, त्यामुळे प्रशासनाने तातडीने ओढ्यावरील अतिक्रमणे हटवून स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सुजाता हांडे, श्रद्धा झांबरे, सचिन पुणेकर म्हणाले की, उंड्रीतील अमित कलरी, अतुरनगर, कडनगर, महंमदवाडी आणि पिसोळीतील पद्मावती मंदिर ते भिंताडेनगर, वडाचीवाडी, हांडेवाडी, होळकरवाडी शेवाळेवाडी- उरुळी देवाची असा नैसर्गिक ओढा आहे. मागिल वर्षी या ओढ्यांना पुर आल्याने गावचा संपर्क तुटला होता, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. ओढ्यालगत प्लास्टिक मोठ्या प्रमाणात साचले असून, पावसाच्या पाण्यात वाहून ओढ्याचा प्रवाह बंद होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. ओढ्यांमध्ये अनेक ठिकाणी राडारोडा टाकला गेला आहे, तर ओढ्यावर अतिक्रमण केल्यामुळे पात्र अरुंद झाले आहे, त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

ओढ्याच्या स्वच्छतेविषयी पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली आहे. मागिल वर्षी उंड्रीतील कडनगरमध्ये ओढ्याला पूर आल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. यावर्षी अशी परिस्थिती उद्भवणार नाही, याची दखल घेऊन ओढ्याची स्वच्छता का केली नाही, अशी विचारणा दत्तात्रय बांदल, जयश्री मासाळ, राजेंद्र भिंताडे यांनी केली.

दरम्यान, पालिका कनिष्ठ अभियंता शशिकांत निवदेकर म्हणाले की, ओढ्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. खासगी जागेतील अंतर्गत नाल्यांची स्वच्छता मालक/ विकासक स्वतःच करत आहेत. याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, अडचणीच्या ठिकाणी स्वच्छता करण्याचे काम पालिकेकडून सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Pune Flood Danger Is Inevitable In The Villages During The Monsoon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top