
औंध : औंधहून शिवाजीनगर मार्गावर राजभवन ते रिझर्व्ह बँकेदरम्यान पुणे क्षेत्रीय महानगर विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आचार्य आनंदऋषीजी महाराज चौकाजवळील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) उभारलेल्या दुमजली उड्डाणपुलाच्या कामाचा दर्जा समाधानकारक नाही, त्यामुळे वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. औंध-शिवाजीनगर मार्गावर राजभवनापासून एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली असून, त्यात प्रवाशांनी अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.