

पुणे, ता. १५ : ‘पारंपरिक लावण्या, बतावणी, वासुदेव, पिंगळा, वाघ्या-मुरळी तसेच महाराष्ट्राची लोकधारा सादर करणाऱ्या लोककलावंतांवर राज्य सरकारने निर्बंध लादल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात उपासमारीची वेळ येत आहे. लोककलावंतांवर होणारा हा अन्याय दूर करावा’, अशी मागणी ज्येष्ठ लोककलावंतांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
ज्येष्ठ लावणी कलावंत सुरेखा पुणेकर, माया खुटेगावकर यांच्यासह शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, शशिकांत कोठावळे, शैलेश लोखंडे, अर्चना सावंत, अमर पुणेकर, भाजप सांस्कृतिक आघाडीचे प्रमुख रमेश परदेशी आदी याप्रसंगी उपस्थित होते.
‘‘खरे लोककलावंत अश्लील कार्यक्रम कधीच सादर करत नाहीत. वाद्यवृंदांसह कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांना सरकारकडून सेन्सॉर प्रमाणपत्र मिळालेले असते. पारंपरिक कला कशी जोपासली जाईल याचा आम्ही वर्षानुवर्षे प्रयत्न करीत आहोत. पण सध्या घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे’’, अशी व्यथा खुटेगावकर यांनी मांडली.
‘‘पारंपरिक लावणी नृत्यासंदर्भात गणेशमंडळे परवानगी मागायला जातात तेव्हा निवेदनात लावणी हा शब्द असल्याने कार्यक्रमाला परवानगी नाकारली जाते. सुरेखा पुणेकर, माया खुटेगावकर यांनी पारंपरिक लावणी ही नृत्यकला जोपासली आहे. सरकारच्या निर्बंधांमुळे अशा लोककलावंतांवर अन्याय होत आहे’’, असे खाबिया म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.