पुणे : परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाचे नमुने ‘एनआयव्ही’कडे

कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूला आळा घालण्यासाठी परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहे.
Covid Test
Covid Testsakal

पुणे : कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूला आळा घालण्यासाठी परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे स्त्रावाचे नमुने (स्वॅब) महापालिकेतर्फे थेट राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवले जाणार आहे. त्यामुळे त्यांना संक्रमण झाले आहे, अशा रुग्णांचे लगेच जनुकीय क्रमनिर्धारण (जीनोम स्विक्वेन्सिंग) करणे शक्य होणार आहे. तसेच ज्यांची अहवाल चाचणी नकारात्मक आली आहे. अशांना संस्थात्मक विलगीकरण केले जाईल व दुसऱ्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.

कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात येत असताना सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने पुन्हा एकदा सुरळीत होत आहेत. अशा स्थिती असताना दक्षिण आफ्रिकेत कोरोना ओमिक्रॉन उद्रेक झाला आहे. त्याचे संक्रमण जगातील सुमारे २१ देशांमध्ये झाले आहे. हा विषाणू वेगाने पसरत असल्याने इतर देशही सतर्क झाले असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत पुण्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या मोठी होती, त्यामुळे महापालिकेनेही यावेळी वेळीच उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Covid Test
बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी १२ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

राज्य शासनाकडून ओमिक्रॉनला थोपविण्यासाठी रोज आढावा घेऊन नवे नियम सांगितले जाते आहेत. पुणे शहरात परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करावी, जर त्यांच्या अहवालात कोरोनाचे निदान झाले आहे, अशांना रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले जाणार आहेत. व ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही अशा प्रवाशांसाठी सात संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे. त्यामध्ये दुसऱ्या, चौथ्या व सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी केली जाईल, त्यांचा अहवाल संक्रमण झाले नसल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांना घरी सोडले जाईल व घरात आणखी सात दिवसात सक्तीचे विलगीकरण अनिवार्य असणार आहे. परदेशातून आलेल्या नागरिकास संक्रमण झाले असले तर त्यामध्ये ओमिक्रॉनचा विषाणू आहे की नाही हे ‘एनआयव्ही’ मध्ये तपासले जाते. त्यामुळे परदेशातून आलेल्या नागरिकांचे स्त्राव नमुने एनआयव्हीमध्येच तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत.

‘‘परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी एनआयव्हीमध्ये केली जाणार आहे. ज्या नागरिकांना लागण झालेली नाही अशांची दुसऱ्या, चौथ्या व सातव्या दिवशी पुन्हा चाचणी केली जाईल. त्यातही अहवाल नकारात्मक आला तर घरी सोडले जाईल. शासनाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत हे निर्देश दिले आहेत.’’

- रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Covid Test
जल जीवन मिशनच्या कामांना गती द्या अन्यथा कठोर कारवाई - जिल्हाधिकारी

आदेशात अस्पष्टतेमुळे गोंधळ

पुण्यातील लोहगाव विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमान सेवा सध्या बंद आहे. त्यामुळे परदेशातून पुण्यात येणारे नागरिक मुंबई, दिल्ली व इतर ठिकाणांवरून येणार आहेत. अशा नागरिकांची कोरोना चाचणी व संस्थात्मक विलगीकरण तेथेच केले जाणार आहे की पुण्यात केले जाणार आहे?, परदेशातून पुण्यात येणाऱ्या नागरिकांची माहिती महापालिकेला कशी मिळणार ?, त्यांच्या संपर्कात येणारे नागरिक, चालक यांच्यासंदर्भात काय करायचे याबाबतही स्पष्टता नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com