पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे कोरोना पॉझिटिव्ह

Pune Former MP Anil Shirole tests corona positive
Pune Former MP Anil Shirole tests corona positive
Updated on

पुणे : भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे शिरोळे कुटुंबीयांतर्फे बुधवारी सांगण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

काही लक्षणे जाणवल्यावर वैद्यकीय चाचण्या केल्या. त्यांत कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली, अशी माहिती माजी खासदार शिरोळे यांनी ट्विटरवर मंगळवारी संध्याकाळी शेअर केली. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्यांच्याही आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी ट्विटरवर केले आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे हे अनिल शिरोळे यांचे पुत्र आहेत.

सुमारे 70 वर्षांचे अनिल शिरोळे हे तंदुरुस्ती बाबत कमालीचे जागरूक आहेत. व्यायाम, योगासने यांचा नियमित सराव ते करतात. सध्या त्यांना कोणताही त्रास होत नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

''शिरोळे यांची प्रकृती सुधारत आहे. त्यांना सध्या कोणीही भेटायला येऊ नये,'' असे आवाहन त्यांचे पुत्र आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले आहे. पुण्यात या पूर्वी महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, ते आवाहन पार करून मोहोळ पुन्हा कार्यरत झाले आहेत. पुण्यात या पूर्वी 8 नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली होती. ते सर्वजण आता सुखरूप आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune citizens can now suggest development projects for the PMC's 2027–28 Budget. Proposals can be submitted until August 31.
Despite a civic notice, mud from a construction site once again spread across Rajabahadur Mill Road in Pune, forcing the fire brigade to clean the stretch after vehicles skidded.
Pune Mayor Manjusha Nagpure claims the city has fewer potholes this monsoon than last year, even as road repair work continues across the city.
Land Acquisition
Marathi News Esakal
www.esakal.com