Pune New Vande Bharat Express : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने पुण्याहून आणखी चार वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पुण्यापासून दोन वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन धावत असून ही संख्या आता सहा होणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे आता प्रवासाला अधिक गती मिळणार असून पुणेकरांचा प्रवास आणखी जलद आणि सोपा होणार आहे.