esakal | पुणे : कंपनीचे तीन कोटी ६८ लाख स्वतःच्या खात्यात वळविले
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पुणे : कंपनीचे तीन कोटी ६८ लाख स्वतःच्या खात्यात वळविले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : आंतरराष्ट्रीय कंपनीत कामाला असलेल्या एका कामगाराने त्यांच्या सहका-याच्या लॉग इन आयडीचा वापर करून कंपनीचे तीन कोटी ६८ लाख रुपये परदेशातील बँक खात्यातून स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केला.

अपहाराच्या रकमेतून आरोपीने बीएमडब्ल्यू कारसह आरोपीने फ्लॅट, दुचाकी तसेच दागिन्यांची देखील खरेदी केल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. आदित्य राजेश लोंढे (वय २९, रा. शिवाजीनगर) असे अपहार प्रकरणी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात कार्थिक गणपथी ऊर्फ कार्थिक सुब्रमनीयन व इतर बँक खातेधारकांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल रतनलाल कौल (वय ४१) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आदित्य याच्याकडून पोलिसांनी मोबाईल लॅपटॉप आणि कार असा ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा: यंदा जिल्ह्यातील 1800 होमगार्ड गणेशोत्सवावर बहिष्कार टाकणार?

आदित्य याने तो काम करीत असलेल्या कंपनीतील एका सहकारी कर्मचा-यांच्या लॉगइन आयडीद्वारे २४ गैरव्यवहार करत कंपनीची तीन कोटी ६८ लाख रुपयांची फसवणूक केली. संबंधित रक्कम त्याने परदेशातील एका बँक खात्यात पाठवले व त्यानंतर ते स्वतःच्या खात्यात वळवून घेतली. कार्थिक याने आदित्यच्या बँक खात्यात दोन कोटी ३७ लाख ८७ हजार रुपये पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आदित्य याने अपहार केलेल्या रकमेचा वापर करीत ६६ लाख ३ हजार ७७७ रुपयांची बीएमडब्ल्यू कार, ११ लाख ४७ हजार ६०० रुपये किमतीचा फ्लॅट, सोन्याचे दागिने आणि दुचाकीची खरेदी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्याच्या बँक खात्यावर विदेशातून पैसे जमा झाले असून गुन्ह्याची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्वरूपाची असल्याचे त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करत आदित्य याला सहा सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

loading image
go to top