esakal | अर्जदारावर दबाव आणल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक निलंबीत । Police
sakal

बोलून बातमी शोधा

अर्जदारावर दबाव आणल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक निलंबीत

अर्जदारावर दबाव आणल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक निलंबीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अर्जदारावर दबाव आणल्याचा ठपका ठेवत एका पोलिस उपनिरीक्षकासह पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबित करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर यांनी याबाबतचा आदेश दिला. पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनवणे आणि पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर पालवे अशी निलंबन केलेल्यांची नावे आहेत. सोनवणे हे सध्या पोलिस नियंत्रण कक्ष येथे नेमणुकीला होते.

हेही वाचा: कल्याण डोंबिवलीत पुन्हा नाशिक पॅटर्न ?

तर, पालवे हे विश्रांतवाडी पोलिस ठाण्याला नेमणुकीला होते. पुणे पोलिसांकडे आलेल्या एका अर्जामध्ये चौकशी करण्यात आली. त्यावेळी प्राथमिक चौकशीत अनेक गंभीर बाबी निष्पन्न झाल्या. यामध्ये दोन्ही पोलिसांनी संबंधित तक्रारदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तसेच, गुन्हेगारी स्वरुपाचे प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार दोघांची खात्याअंतर्गत चौकशी सुरू करून दोघांवर निलंबानाची कारवाई करण्यात आली आहे, असे डॉ.सुपेकर यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

loading image
go to top