esakal | पुणे : व्यवसायिकाचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात फरारी आरोपीस अटक
sakal

बोलून बातमी शोधा

crime.jpg

पुणे : व्यवसायिकाचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात फरारी आरोपीस अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : खंडणी उकळण्याच्या उद्देशाने हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण करण्याच्या गुन्ह्यात दोन वर्ष पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने हि कारवाई केली. आदित्य रोहिदास साळुंके (वय 24, रा. शिवणे ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव धायरी परिसरातील एका हॉटेल व्यावसायिकाचे आदित्य साळुंके व त्याच्या तीन साथीदारांनी खंडणीसाठी अपहरण केले होते. हॉटेल व्यावसायिकास मारहाण करून त्यांनी सोडून दिले होते. दरम्यान, याप्रकरणी हवेली पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी साळुंकेच्या तीन साथीदारांना अटक केली होती. तर साळुंके हा दोन वर्षांपासून फरारी होता.

हेही वाचा: शेतकरी संघटनांची 27 नोव्हेंबरला बंदची हाक

तो वास्तव्याची ठिकाणे सतत बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. खंडणी विरोधी पथकातील (एक) सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप बुवा, पोलिस नाईक राजेंद्र लांडगे, विवेक जाधव, नितीन रावळ व प्रफुल्ल चव्हाण हे शहरामध्ये गस्त घालत होते. त्यावेळी अपहरण व खंडणीच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपी वारजे येथील आंबेडकर चौकात येणार असल्याची खबर राजेंद्र लांडगे व नितीन रावळ यांना मिळाली. त्यानुसार, त्यांच्या पथकाने आंबेडकर चौकात सापळा रचून आरोपीस अटक केली. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यास पुढील तपासासाठी हवेली पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले.

loading image
go to top