
Pune Ganpati Visarjan
esakal
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक यंदा उत्साह, शांतता आणि सुरक्षिततेचा अनोखा संगम घेऊन आली. 31 तास चाललेल्या या भव्य मिरवणुकीत मानाच्या गणपतींनी वेळेचे पालन केले, परंतु वाढलेल्या गर्दीमुळे काही मंडळांना उशीर झाला. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या यशस्वी सोहळ्यासाठी पोलीस दल आणि गणेश मंडळ कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.