
पुणे : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात आणि उत्साही वातावरणात बुधवारी सर्वत्र गणरायाचे आगमन झाले. पुणे शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र गणेशभक्तांच्या आनंदाला उधाण आले होते. आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या आगमनाने चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.