गणेशमूर्ती खरेदी, प्रतिष्ठापनेनिमित्त वाहतुकीत बदल

गणेशमूर्ती खरेदी, प्रतिष्ठापनेनिमित्त वाहतुकीत बदल
Published on

पुणे, ता. १२ ः प्रतिष्ठापना सोहळा, तसेच शिवाजीनगर भागातील डेंगळे पूल परिसरात गणेशमूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. डेंगळे पूल, मध्य भागातील छत्रपती शिवाजी रस्ता, सारसबाग, मुंढव्यातील केशवनगर परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहे.
शिवाजीनगर येथील डेंगळे पूल परिसरात गणेशमूर्ती विक्रेत्यांनी स्टाॅल उभे केले आहेत. या भागातील वाहतूक व्यवस्थेत शनिवारपासून सोमवारपर्यंत (ता. १२ ते १४) वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा चौक ते मंडईतील गोटीराम भय्या चौक हा मार्ग वाहतुकीस बंद असणार आहे. वाहनांनी संताजी घोरपडे पथ, कुंभारवेस चौक, मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौक या मार्गाने जावे. जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी पुतळा चौक, खुडे चौकमार्गे कुंभारवाड्याकडे जाणाऱ्या वाहनांनी छत्रपती शिवाजी पुलावरून डावीकडे वळून संताजी घोरपडे मार्गाने कुंभारवेसकडे जावे.
सारसबाग परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ केंद्र परिसरात सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा, नीलायम चित्रपटगृहाजवळ वाहने लावावीत, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी केले.

सोमवारी असे असतील बदल
प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सोमवारी (ता. १४) मध्यभागात वाहतूक बदल करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. कसबा पेठेतील फडके हौद चौक ते जिजामाता चौक, फुटका बुरूज, अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक), मोती चौक, मंगला चित्रपटगृहासमोरील रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. मुंढव्यातील केशवनगर परिसरात मूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. १४) या भागात वाहतूक बदल करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक पर्यायी वळविण्यात आली आहे.

पीएमपी बस मार्गात बदल
शिवाजीनगर बसस्थानकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस मार्गात बदल करण्यात आला आहे. शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस स. गो. बर्वे चौक (माॅडर्न कॅफे), जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, टिळक रस्तामार्गे स्वारगेटकडे जातील. महापालिका भवन परिसरातून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस जंगली महाराज रस्त्याने जातील.

या ठिकाणी पार्किंग व्यवस्था
- कामगार पुतळा ते छत्रपती शिवाजी पुतळा
- कामगार पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी पुतळा
- संताजी घोरपडे पथ ते गाडगीळ पुतळा
- टिळक पूल ते भिडे पूल, नदीपात्रातील रस्ता
- मंडईतील वाहनतळ
- छत्रपती शिवाजी रस्त्यावरील शाहू चौक ते राष्ट्रभूषण चौक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com