Police COmmissioner Amitesh Kumar
sakal
पुणे - ‘गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात आणि निर्विघ्नपणे पार पडली. मिरवणूक किती तास चालली, यापेक्षा लाखो भाविकांच्या गर्दीत चेंगराचेंगरी टाळून नागरिकांच्या सुरक्षेलाच पोलिसांचे सर्वोच्च प्राधान्य होते,’ असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. विसर्जनाच्या दोन दिवसांतील ध्वनी प्रदूषणाच्या नोंदींचे संकलन सुरू असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.