esakal | #बाप्पामोरया पुण्यातील देखाव्यांत पर्यावरण संवर्धनाचा संदेश
sakal

बोलून बातमी शोधा

#बाप्पामोरया पुण्यातील देखाव्यांत पर्यावरण संवर्धनाचा संदेश

शहराच्या मध्यवर्ती भागातील मंडळांनी पौराणिक देखाव्यांसह पर्यावरण रक्षण, लहान मुलांना लागलेले मोबाईलचे वेड अशा सामाजिक विषयांवर देखावे साकारले आहेत.

#बाप्पामोरया पुण्यातील देखाव्यांत पर्यावरण संवर्धनाचा संदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहराच्या मध्यवर्ती भागातील मंडळांनी पौराणिक देखाव्यांसह पर्यावरण रक्षण, लहान मुलांना लागलेले मोबाईलचे वेड अशा सामाजिक विषयांवर देखावे साकारले आहेत. प्राचीन मंदिरांच्या प्रतिकृती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

पूरग्रस्तांना मदत 
दरवर्षी सुंदर देखावा सादर करणाऱ्या शनिवार पेठेतील नातूवाडा मित्र मंडळाने यंदा देखावा केलेला नाही. त्यांनी एक लाख रुपयांची रक्कम पूरग्रस्तांना दिली आहे. नारायण पेठेतील हनुमान मित्र मंडळाची गणपतीची मूर्ती लाकडी आहे. यंदा मंडळाने अलबत्या गलबत्त्या देखावा सादर करताना प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश दिला आहे.

पर्यावरणाबाबत जागृती
सदाशिव पेठेतील अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळाने पर्यावरणाचा ऱ्हास, त्यातून येणारी नैसर्गिक आपत्ती आणि 
रासायनिक खतांचा दुष्परिणाम होत आहे. यामुळे निर्माण झालेला राक्षस आपल्या घरापर्यंत येऊन पोचला आहे. हे हलत्या देखाव्यातून स्पष्ट केले आहे. 

अनाथ मुलांना मदत
अप्पा बळवंत चौकातील करळेवाडी सार्वजनिक मंडळ ट्रस्टने यंदाही ‘कुवलीयापीडा हत्तीचा वध’ (श्रीकृष्ण लीला) हा हलता पौराणिक देखावा साकारला आहे. 
विद्युत रोषणाईमुळे हा देखावा आकर्षक झाला आहे. वर्षभर सामाजिक उपक्रम या मंडळाकडून राबविले जातात. यंदा दहीहंडी साजरी न करता अनाथ मुलांना मदत व पूरग्रस्तांना शैक्षणिक मदत केली.

कल्पकतेने खेळण्यांचा वापर
संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने अतिशय कल्पकतेने लहान मुलांच्या खेळण्यांच्या वापरातून आकर्षक गणेशमूर्ती साकारली आहे. मुले सध्या मोबाईल बघण्यात गुंग आहेत, ते बौद्धिक व मैदानी खेळ खेळत नाहीत. त्यावर जनजागृती करणारा हे देखावा लक्षवेधी ठरत आहे. हा गणपती साकारण्यासाठी सुमारे २५ खेळण्यांचा वापर केला आहे.

loading image
go to top