
Pune Ganesh Visarjan 2025
Sakal
पुणे : लक्ष्मी रस्त्यावर पार पडलेली यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक नेहमीप्रमाणेच भव्य, दिव्य आणि देखणी ठरली. मानाचे व प्रमुख गणेशोत्सव मंडळांचे आकर्षक रथ, पारंपरिक नगरखाना, वाद्य पथके आणि त्याला समरसून साथ देणारी ढोल-ताशा पथकांची सळसळती ऊर्जा, यामुळे मिरवणूक भाविकांसाठी पर्वणी ठरली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि अखिल मंडई मंडळाच्या श्री शारदा गजाननाचे दर्शन घेतल्यानंतरच काही भाविकांची पावले घराकडे वळली. दरम्यान, पोलिसांकडून वेळेआधी लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणूक पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ढोल-ताशा पथकांच्या अतिरेकामुळे पोलिसांच्या नियोजनावर पाणी फिरले.