
Pune Ganesh Visarjan 2025
Sakal
पुणे : ढोल-ताशाचा गजर, डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या आकर्षक रांगोळ्या, संतांचे पुतळे व पौराणिक देखाव्यांनी नटलेले रथ, चिमुकल्या वादकांनी केलेले ढोलवादन असे नयनरम्य दृश्य कुमठेकर रस्त्यावरील मिरवणुकीदरम्यान पाहायला मिळाले.
दिवसा पारंपरिक वाद्य व रात्री ‘डीजे’च्या आवाजावर तरुणाईची पावले थिरकली. यंदा या रस्त्यावरून ६१ मंडळांनी विसर्जनासाठी मार्गक्रमण केले. गेल्यावर्षी ही संख्या ५४ होती. कुमठेकर रस्त्यावरील गणेश मंडळांनी ‘आस्ते कदम’ टाकत मिरवणूक रविवारी सकाळी साडेनऊला संपविली.