Ganesh Visarjan 2025 : मानाच्या गणपतींचे आठ तासांत विसर्जन, शिस्तबद्ध मिरवणुकीमुळे दीड तास लवकर; लाखो भाविकांच्या उपस्थितीत जल्लोष

Ganesh Utsav 2025 : पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची विसर्जन मिरवणूक यंदा अवघ्या आठ तास आठ मिनिटांत वेळेत पार पडून शिस्त आणि परंपरेचा उत्तम संगम पाहायला मिळाला.
Pune Ganesh Visarjan 2025 Ganesh Visarjan in Pune Ends in Record 8 Hours

Pune Ganesh Visarjan 2025 Ganesh Visarjan in Pune Ends in Record 8 Hours

Sakal

Updated on

पुणे : ‘‘पुण्यातील मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक आम्ही वेळेतच संपविणार’ असा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिलेला विश्वास खरा ठरविला. सनई-चौघडा, नगारावादनाचा मंगलमय सूर... भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या ढोल-ताशाचा गजर... फुलांची मुक्त उधळण...‘मोरयाऽऽ...मोरयाऽऽ’, ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष... अन्‌ दर्शनासाठी जोडले जाणारे लाखो हात... अशा पारंपरिक पद्धतीने अन्‌ तेवढ्याच शिस्तबद्धपणे पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक यंदा अवघ्या आठ तास आठ मिनिटांत आटोपली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दीड तास अगोदर भाविकांच्या अलोट गर्दीने, वरुणराजाच्या साक्षीने मानाच्या पाच गणपतींची विसर्जन मिरवणूक संपली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com