
Pune Ganesh Visarjan 2025
Sakal
पुणे : गणरायाच्या निरोपाचा सोहळा हा पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेत एक वेगळेच स्थान राखतो. दहा दिवसांच्या जल्लोषानंतर गणराय विसर्जन मिरवणुकीसाठी निघतात, तेव्हा शहराच्या रस्त्यांवर उत्साह, भक्तिभाव आणि सांस्कृतिक ऊर्जा यांचा संगम पाहायला मिळतो.