

Pune Ganesh Visarjan 2026: Anant Chaturdashi Preparations Complete
esakal
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली असून, मानाचा पहिला कसबा गणपती, दगडूशेठ हलवाई गणपतीसह शहरातील विविध गणेश मंडळांच्या मिरवणुका उत्साहात पार पडणार आहेत. विसर्जन सोहळा शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पुणे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख विसर्जन मार्गांसह विविध भागांमध्ये तब्बल 10 हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात राहणार आहेत.