
Pune Ganesh Visarjan 2025
Sakal
पुणे : ‘‘गणेश विसर्जन मिरवणुकीला दोन-तीन तासांचा विलंब होणे, हा विषय महत्त्वाचा नाही. मात्र, मिरवणूक उत्साहात, शांततेत आणि सुरक्षिततेत पार पडणे, हे आमच्यासाठी महत्त्वाचे होते. त्याला आम्ही अधिक प्राधान्य दिले,’’ असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. सर्व गणेश मंडळांच्या सहकार्यामुळे हा उत्सव सुरळीतपणे पार पडल्याचे त्यांनी सांगितले.