

Pune Ganesh Visarjan Procession Theft Gold Jewellery Worth 9.77 Lakh Stolen In 14 Cases Amid Heavy Crowd
esakal
पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी भाविकांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याच्या १४ घटना समोर आल्या आहेत. २५ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या या घटनांमध्ये सोन्याच्या चेन, मंगळसूत्र आणि लॉकेटसह सुमारे नऊ लाख ७७ हजार ३१४ रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. याप्रकरणी फरासखाना आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.