esakal | पुणे : खाणीत होणार शास्त्रीय पद्धतीने मूर्ती विसर्जन
sakal

बोलून बातमी शोधा

pune

पुणे : खाणीत होणार शास्त्रीय पद्धतीने मूर्ती विसर्जन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात फिरत्या हौदात आणि मूर्ती संकलन केंद्रावर जमा होणाऱ्या मूर्त्यांची शास्त्रीय पद्धतीने वाघोलीतील खाणीत पुन्हा एकदा विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी घनकचरा विभागाने निविदा काढून खाण घेतली आहे.

महापालिकेतर्फे गेल्या अनेक वर्षापासून नदीचे घाट, हौद या ठिकाणी विसर्जन व्यवस्था केली जाते. ज्या मूर्त्यांचे हौदात विसर्जन झाले आहे, त्या मूर्त्या बाहेर काढून ट्रक मध्ये टाकून शहराच्या बाहेर खड्ड्यात किंवा नदीमध्ये टाकून दिल्या जात होत्या. यामुळे मूर्त्यांची विटंबना होत असल्याने महापालिकेच्या या कारभारावर नागरिकांनी प्रचंड टीका केली होती. नागरिकांच्या भावना दुखावत असल्याने महापालिकेने योग्य पद्धतीने विसर्जन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यामधूनच खाणीत शास्त्रीय पद्धतीने विसर्जन करण्याचा पर्याय समोर आला.

हेही वाचा: आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदी डॉ. नितीन करमळकर

शहराच्या हद्दीलगत अनेक ठिकाणी बंद पडलेल्या खाणी आहेत. ही खाण भाड्याने घेऊन मूर्त्या तेथे नेल्या जातात. यंदासाठी महापालिकेने वाघोली येथील खाण घेतली आहे. शहरातील कचरा प्रकल्पांचे रॅम्प येथे परिसरातील मूर्त्या एकत्र आणल्या जातील. तेथून महापालिकेच्या मोठ्या ट्रकमध्ये या मूर्त्या ठेवून खाणीकडे नेल्या जाणार आहेत. खाणीमध्ये पुढील १५ दिवस सकाळी सात ते दुपारी दोन आणि दुपारी दोन ते रात्री १० या दोन पाळ्यांमध्ये महापालिकेचे पथक काम करणार आहे. या ठिकाणी १५ बिगारी, ४ मुकादम, १ आरोग्य निरीक्षक नियुक्त करण्यात आला आहे, अशी माहिती घनकचरा विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी दिली.

loading image
go to top