esakal | पुणे : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागरीकांची गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

ganpati

पुणे : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागरीकांची गर्दी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गणेश मुर्ती, पुजेचे साहित्य, फळे-फुले खरेदीसाठी नागरीक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने शुक्रवारी दिवसभर मध्यवर्ती भागात गर्दी होती. तर सायंकाळी नागरीक कुटुंबासह बाहेर पडल्याने मध्यवर्ती भागात नागरीकांची गर्दी होती. पोलिसांकडून वाहतुक कोंडी होऊ नये तसेच गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यन, नागरीकांनी दर्शनासाठी बाहेर न पडता ऑनलाईन दर्शन घ्यावे, असे आवाहन पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी केले आहे.

गणेशोत्सवाचा पहिलाच दिवस असल्याने शुक्रवारी नागरीक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, शनिवार वाडा, गाडगीळ पुल, सारसबाग, सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता या परिसरात गणेश मुर्ती खरेदी करण्यासाठी शुक्रवारी सकाळपासूनच नागरीकांनी गर्दी केली होती.

हेही वाचा: अखेर मनोहरमामाला बारामती पोलिसांनी साताऱ्यात पकडले

मास्क, सोशल डिस्टंसिंगचे कोणत्याही प्रकारे पालन करण्यात येत नसल्याची सद्यस्थिती होती. हिच स्थिती फळे, फुले व पुजेचे साहित्य, मिठाईची दुकाने येथे खरेदीसाठी आलेल्या नागरीकांमध्येही दिसत होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत हि गर्दी कायम होती. गर्दीमुळे वाहतुक कोंडी होऊ नये, यासाठी मॉडर्न कॅफे परिसरातुन बस, कार व अन्य खासगी वाहनांना रस्ता बंद करण्यात आला होता. केवळ दुचाकी व रिक्षांनाच या रस्त्यावर परवानगी असल्याने वाहतुक कोंडी झाली नाही.

दरम्यान, सायंकाळी सहा वाजल्यापासून शिवाजी रस्ता, बेलबाग चौक, मंडई, तुळशीबाग या ठिकाणांसाह मानाच्या गणपतींच्या परिसरामध्येही नागरीकांची गर्दी वाढू लागली. या गर्दीमध्ये रात्री वाढ झाली. पोलिसांकडून नागरीकांना ये-जा करण्यासाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजुच्या पदपथांचा वापर करण्यास लावण्यात येत होते. गर्दीमुळे वाहतुक कोंडीची समस्या जाणवली नाही.

वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याबाबत पोलिस सहआयुक्त डॉ.शिसवे म्हणाले, ""गणेशोत्सवाचा पहिला दिवस असल्याने मुर्ती व साहित्य खरेदीसाठी गर्दी होती. तर सायंकाळी रस्त्यावर पादचाऱ्यांची काही प्रमाणात गर्दी होती. तरीही नागरीकांनी श्रींच्या मुखदर्शनाऐवजी ऑनलाईन दर्शन घेण्यास प्राधान्य द्यावे. गणेशोत्सव मंडळांनीही त्यादृष्टीने व्यवस्था करावी. प्रत्यक्ष दर्शनाचा आग्रह धरु नये. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभुमीवर आत्ताच खरबदारी घेणे गरजेचे आहे.''

loading image
go to top