
Pune Ganeshotsav: पुण्याचा जगप्रसिद्ध गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पुण्यामध्ये गणेशोत्सवात लेझर बीम लाइटच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय मागील वर्षीत घेण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी लागू केलेल्या या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे सांगण्यात आलेले मात्र निर्णयाची पोलिसांकडून अमंलबजावणी होत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे दाद मागितली आहे.