
nilesh-ghaywal
esakal
निलेश बन्सिलाल घायवळ वय 45, मूळचा सोनेगाव (अहमदनगर) येथील रहिवासी, गेल्या 20 वर्षांपासून पुण्याच्या कोथरुड परिसरात दहशत माजवत आहे. पुण्यातील गुन्हेगारी विश्वात विश्वास आंदेकर आणि घायवळ टोळीची दहशत होती. निलेश घायवळ शार्पशूटर म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर 23 ते 24 गुन्हे नोंदले आहेत. सुरुवातीला तो गजा मारणेच्या टोळीत गुंड म्हणून काम करत होता. एम कॉमपर्यंत शिक्षण घेतलेल्या निलेशची सुतरावाडीत मोठी दहशत होती.