
पुणे : वैभवशाली गणेशोत्सवास उद्यापासून (ता. २७) सुरुवात होत आहे. या भक्तिमय वातावरणात नागरिकांना स्वच्छता, सुरक्षा आणि गणपती विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. मूर्तिदान संकल्पना, निर्माल्य संकलनातून खतनिर्मिती, शाडूमातीचा पुनर्वापर या उपक्रमांवर यंदाही महापालिकेचा भर आहे. विसर्जन घाट, कृत्रिम हौद व लोखंडी टाक्यांची सोय अधिक प्रभावी केली आहे.