Police Bandobast
sakal
पुणे - गणेश विसर्जन मिरवणूक सोहळ्यासाठी पुणे पोलिसांकडून तब्बल दहा हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीवर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून, मिरवणुकीदरम्यान उच्च क्षमतेच्या ध्वनिक्षेपक यंत्रणेचा वापर करणे किंवा निर्धारित ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.