
Pune Ganpati Visarjan 2025
Sakal
पुणे : ‘‘ पुण्यातील विसर्जन मिरवणूक लवकर संपविणार, प्रमुख मंडळांना ठरवून दिलेली वेळ पाळणार, पथकाच्या संख्येवर मर्यादा असे नियोजन करून मिरवणूक कमी वेळेत संपविणार असा निर्धार पोलिसांनी केला होता. पण नेमकेच परिस्थिती विसर्जन मिरवणुकीत दिसून आली. मानाचे गणपतीचे वेळेत विसर्जन झाले. पण त्यानंतर प्रमुख मंडळांना दिलेले आश्वासन पाळण्यात पोलिस अपयशी ठरले. गर्दीवर, ढोल ताशा पथकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयशामुळे मिरवणूक मार्ग ठप्पच झाला. दुसऱ्या दिवशी (ता. ७) लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणूक संपली, मात्र, टिळक रस्त्यावर सायंकाळपर्यंत शेकडो मंडळे रांगेत होती. त्यामुळे रात्री आठ वाजून गेले तरीही मिरवणूक राहिली. ३४ तास मिरवणूक सुरु राहिल्याने नको असलेला हा चुकीचा विक्रम पुणे शहराच्या नावावर नोंद झाला.