pune ganpati visarjan rally
sakal
पुणे - यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर होता, गणपती बाप्पांचा जयघोष होता; पण पुण्याच्या या जल्लोषात एक आवाज मात्र कायमचा हरवला होता. मिरवणुकीच्या प्रस्थानावेळी हमखास उपस्थित राहणारे, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये मिसळून बिनधास्त गप्पा मारणारे आणि नाश्ता आटोपून पुढच्या कार्यक्रमाकडे निघणारे अजितदादा पवार यंदा कुठेच दिसत नव्हते.