पुणे : विसर्जन मिरवणुकीला महात्मा फुले मंडईतून दहा वाजता प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Ganpati visarjan miravnuk

महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक आणि लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास शुक्रवारी (ता. ९) सकाळी ९.३० वाजता महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येईल.

पुणे : विसर्जन मिरवणुकीला महात्मा फुले मंडईतून दहा वाजता प्रारंभ

पुणे - महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक आणि लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास शुक्रवारी (ता. ९) सकाळी ९.३० वाजता महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येईल. त्यानंतर सकाळी १० वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.

अलका टॉकीज चौकात महापालिकेतर्फे स्वागत मंडप उभारण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना श्रीफळ देऊन सन्मानित केले जाईल.

गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्या परिसरातील मार्गावर स्वच्छता व औषधोपचाराची व्यवस्था, कंटेनर, निर्माल्य कलश, कीटकनाशक फवारणी, विसर्जन घाटावर अग्निशमन दल कर्मचारी व्यवस्थापन, घाटावर औषध फवारणी, विसर्जन घाटावर तसेच नदी, तलाव, विहिरी नसलेल्या परिसरात विसर्जन हौद, लोखंडी टाक्याची सोय केली आहे. तसेच जीवरक्षकांच्या नियुक्त्या, सुरक्षा यंत्रणा, विद्युत जनित्र ध्वनिक्षेपक यंत्रणा, जलवाहिनी यांची दुरुस्ती करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार मंडप, बॅरिकेडस उभारण्यात आले आहेत. अलका टॉकीज चौक, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, नारायण पेठ, माती गणपतीजवळ मंडप आणि स्टेज टाकण्यात आले आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृहे, फिरती स्वच्छतागृहांची तयारी करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाची तयारी

डेक्कन जिमखाना आणि लक्ष्मी रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालयाजवळ विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत उपचारासाठी वैद्यकीय पथके नियुक्त केली आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, नर्स आणि वाहनचालक यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

मिरवणुकीत ही खबरदारी घ्या

गुलालामुळे हवेचे प्रदूषण होऊन नागरिकांना डोळे आणि श्वसनाचे विकार होतात. नागरिकांनी गुलाल चेहऱ्यास लावण्याचे टाळून तो फक्त कपाळावर लावावा. गुलाल अंगावर फेकू नये. गुलाल डोळ्यात गेल्यास पाण्याने स्वच्छ करावेत. डोळ्याची आग होणे व चुरचुरणे चालू राहिल्यास वैद्यकीय सल्ला घेऊन उपाययोजना करावी. शक्यतो नैसर्गिक रंगाचा वापर केलेल्या गुलालाचा वापर करावा.

Web Title: Pune Ganpati Visarjan Miravnuk Procession Starts From Mahatma Phule Mandai At 10 Oclock

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneGanapti Visarjan