पुणे : कचरा गोळा करण्याची यंत्रणा सक्षम नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचरा

पुणे : कचरा गोळा करण्याची यंत्रणा सक्षम नाही

उंड्री : कचरा गोळा वेळेत येत नाहीत, कचरा टाकण्यासाठी कंटेनर नाहीत, त्यामुळे नागरिक बसथांबे, रस्त्याच्या कडेला किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतात. कचरा गोळा करण्याची यंत्रणा अद्याप सक्षम नसल्याने कचरा प्रश्न अद्याप सुटला नाही. रस्त्यालगतच्या कचऱ्यामध्ये अन्न शोधण्यासाठी मोकाट कुत्री आणि जनावरे कचरा विस्कटत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कात्रज- बायपास रस्ता, उंड्री-वडाचीवाडी रस्ता, उंड्रीतील कडनगर- होलेवस्ती- भिंताडेनगर, एनआयबीएम, पिसोळी-खडीमशीन चौक, उंड्री-वडाची, हांडेवाडी-होळकरवाडी, हांडेवाडी-मंतरवाडी, सय्यदनगर-महंमदवाडी, हांडेवाडी-मंतरवाडी, होळरवाडी-वडाचीवाडी, पिसोळी चौक-जगदंबा रस्ता, अंतुलेनगरमध्ये ठिकठिकाणी कचरा साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

महापालिकेमध्ये गावे समाविष्ट झाल्यानंतर कचरा गाड्यांमध्ये वाढ झाली नाही. कचरा वेळच्या वेळी उचलला जात नाही, त्यामुळे नागरिक रस्त्याच्या कडेला किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतात. ओला-सुका कचरा प्लास्टिकच्या पिशवीत बांधून टाकल्यामुळे मोकाट कुत्री आणि जनावरांच्या पोटात अन्नाबरोबर प्लास्टिक जात असल्याने त्यांच्या जीवाला धाका वाढला आहे.

- गौरी फुलावरे, रेणुका भिंताडे, उंड्री

कचरा समस्या दिवसेंदिवस प्रकर्षाने जाणवत आहे. पालिका प्रशासनाकडून वेळीच कचरा उचलला जात नाही, त्यामुळे कचऱ्याची दुर्गंधी पसरून साथीच्या आजाराचा नागरिकांना त्रास होत आहे. पिसोळीतील पेट्रोलपंपासमोर असलेला नाला कचऱ्याने बुजला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होणार आहे.

-डॉ. प्रियंका मासाळ, जयश्री मासाळ, पिसोळी

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तत्पर कचरा गोळा करण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. क्षेत्रफळानुसार सेवकांची संख्या वाढविण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे कचरा समस्येचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

डॉ. ज्योती धोत्रे, महापालिका सहायक आयुक्त- कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय

Web Title: Pune Garbage Collection System Not

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..