
Pune Pashan Garbage
Sakal
पाषाण : पाषाण-सुतारवाडी लिंक रस्ता परिसरात कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अभिनव महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर कचऱ्याने व्यापला असून, पावसामुळे कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.