

पुणे, ता. २९ : ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ (जीबीएस) झालेल्या नांदोशी (सिंहगड रस्ता) येथील ५६ वर्षीय महिलेचा ससून रुग्णालयात मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा पुणे शहरातील ‘जीबीएस’चा पहिला मृत्यू ठरला. याआधी धायरीतील डीएसके विश्व सोसायटीमधील ४० वर्षीय तरुणाचा सोलापुरातील मार्कंडेय सहकारी रुग्णालयात उपचारादरम्यान २५ जानेवारीला मृत्यू झाला.