
Pune Ganesh Visarjan 2025
sakal
पुणे : शहरातील गणेशोत्सव मोठ्या आनंदोत्साहात पार पडत आहे. विशेषतः घरगुती गणपती, गौरी-गणपती विसर्जनानंतर भाविकांची पावले गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी वळू लागली आहेत, तर दुसरीकडे शनिवारी (ता. ६) गणपती विसर्जनामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता राहू नये, यादृष्टीने महापालिकेकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विसर्जन घाट, पाण्याच्या टाक्या, विसर्जन मार्गावरील स्वच्छता, भाविकांसाठी स्वच्छतागृहांपासून नदीपात्रातील सुरक्षिततेसंदर्भातील उपाययोजना करण्यावर महापालिका प्रशासनाने भर दिला आहे.