

IMD Forecast Brings Relief to Pune: Rainfall to Reduce Over Next 3–4 Days
sakal
पुणे: गेल्या पाच दिवसांपासून शहराला झोडपून काढणाऱ्या पावसाने गुरुवारी (ता. ९) अखेर विश्रांती घेतली. पावसाच्या या उघडिपीमुळे शहरात दाखल झालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला. पुणेकरांनी घराबाहेर पडत आल्हाददायक वातावरणात वारीचा आनंद घेतला.