esakal | पुणेकरांनो, पुढील काही दिवसांत असा पडणार आहे पाऊस!
sakal

बोलून बातमी शोधा

rain

पुणेकरांनो, पुढील काही दिवसांत असा पडणार आहे पाऊस!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये 9.1 मिलिमीटर पाऊस नोंदला. शिवाजीनगर येथील वेधशाळेत 1 जूनपासून आतापर्यंत 449.6 मिलिमीटर पाऊस पडला. पाषाण येथे 489.3 आणि लोहगाव येथे 514.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या 6 टक्के पाऊस

पुणे जिल्ह्यात पावसाळ्यात 1 जून ते 12 सप्टेंबर दरम्यान सरासरी 758.9 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा या दरम्यान 803.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत 6 टक्के जास्त पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. जिल्ह्यात गेल्या महिन्यात पावसाने ओढ घेतली होती. त्यामुळे त्या वेळच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, आठवड्याभरापासून पडणाऱ्या पावसाने दिलासा मिळाला आहे.

पुढील दिवसात असा पडणार पाऊस

पुणे शहराच्या परिसरातील घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शहरात आकाश सामान्यतः ढगाळ राहणार असून, पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील, असेही स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा: पवना धरणातून विसर्ग सुरू; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पुणे जिल्ह्यात पडलेला पाऊस (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये)

लवळे - 18.5

एनडीए - 6

गिरीवन - 62

दुदुळगाव - 5

माळीन आंबेगाव - 59

शिवाजीनगर - 7

तळेगाव ढमढेरे - 2

पाषाण - 11.5

जुन्नर - 21

इंदापूर - 9.5

मगरपट्टा - 1.5

शिरूर - 4

वडगाव शेरी - 3.5

खडकवाडी आंबेगाव - 2

खेड - 8

वाल्हे-पुरंदर - 0.5

loading image
go to top