Youth Attacked with Sharp Weapon in Ghorpadi
Esakal
पुण्यातील घोरपडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादातून एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. अजिंक्य गवळी असे हल्ल्यातील पीडित तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अजिंक्य गवळी यांनी तक्रार दाखल केली असून, त्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.