Pune: दुसऱ्या मुलाला डेट का करतेस म्हणत तरुणाची तरुणीला जीवे मारण्याची धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीवे मारण्याची धमकी

दुसऱ्या मुलाला डेट का करतेस म्हणत तरुणाची तरुणीला जीवे मारण्याची धमकी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘दुसऱ्या मुलाला डेट का करतेस,’ असे म्हणून एका तरुणाने उच्च शिक्षित तरुणीला वारंवार फोन, मेसेज, ई-मेलद्वारे त्रास देऊन जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित तरुणावर धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १८ डिसेंबर २०२० पासून सुरू होता.

या प्रकरणी २९ वर्षीय तरुणीने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून मूळचा हरिद्वार येथील असलेल्या एका तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी पुण्यातील आयसर संस्थेत शिक्षण घेत असून वसतिगृहात राहते. आरोपी तरुणाने तिला ‘तू दुसऱ्या मुलाला डेट का करे’ अशी विचारणा केली. त्यानंतर त्या कारणावरून आरोपीने तरुणीला सातत्याने मोबाइलवर फोन, मेसेज करून त्रास दिला. काही वेळेला त्याने पाठलाग देखील केला. तसेच, अनोळखी ई-मेलवरून मेल करून जिवे मारण्याची धमकी दिली आणि शिवीगाळ केली आहे. या त्रासाला कंटाळून तरुणीने चतु:श्रृंगी पोलिसात धाव घेत तक्रार दिली आहे.

loading image
go to top