esakal | पुणे : मुलीच्या खुनातील आरोपींवर खटला दाखल करून त्वरित कारवाई करावी | Statement
sakal

बोलून बातमी शोधा

Janandolan Organization

पुणे : मुलीच्या खुनातील आरोपींवर खटला दाखल करून त्वरित कारवाई करावी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट - इयत्ता ८ वीत शिकत असणाऱ्या मुलीचा बिबवेवाडी येथे कोयत्याने वार करुन तिचा निर्घृणपणे खुन करण्यात आला. ही घटना अत्यंत क्लेशदायक आणि हादरून टाकणारी आहे. मुलींवर वारंवार असे अत्याचार आणि हिंसाचाराच्या घटना घडत असतील तर त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा गोष्टींना चरक बसण्यासाठी आणि आळा घालण्यासाठी कडक पावले उचलणे महत्वाचे आहे. तरी ह्यासंदर्भात आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. यावेळी त्यांच्यावर त्वरित खटला दाखल करून कारवाई करण्याची मागणी जनअदालत महिला आघाडीच्या अध्यक्षा अ‍ॅड. राणी कांबळे सोनावणे यांनी संस्थेतर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे व पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्याकडे निवेदन सुपूर्त केले.

यावेळी अ‍ॅड. रेश्मा शिकलगार, अ‍ॅड. जान्हवी देशपांडे, अ‍ॅड. शितल काकडे, अ‍ॅड. स्वाती चौधरी व अ‍ॅड. न्यानदा वाघमारे उपस्थित होत्या.

loading image
go to top