esakal | कात्रज नवीन बोगद्याजवळ खून; प्रियकरानेच केला प्रेयसीवर चाकूने वार
sakal

बोलून बातमी शोधा

pune

कात्रज नवीन बोगद्याजवळ खून; प्रियकरानेच केला प्रेयसीवर चाकूने वार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : किरकोळ वादातुन प्रियकराने तरुणीवर चाकूने वार केले. तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा मृत्यु झाला. हि घटना रविवारी रात्री 10 वाजता कात्रज नवीन बोगद्याजवळ घडली. तरुणीच्या खुनाप्रकरणी प्रियकरास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली.

सपना दिलीप पाटील (वय 32, रा. पवार हॉस्पिटलजवळ, बालाजीनगर, कात्रज) असे खुन झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर रामकिसन गिरी (वय 36, रा. परभणी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना कात्रज येथील रिलायन्स मार्टमध्ये सफाई कामगार म्हणून काम करीत होती. तर रामकिसन हा एका होटेलमध्ये कामाला होता. त्यांचे मागील 5 ते 6 वर्षापासून प्रेमसंबंध होते.

त्यांच्यात किरकोळ कारणणावरुन भांडणे झाली होती. दरम्यान, रविवारी रामकिसनने प्रवासी कार भाडयाने घेऊन रिलायन्स मार्ट येथे जाउन सपनाला जेवण करण्यासाठी बाहेर नेले. त्यानंतर त्याने कार चालकास नवले पूलापासून कात्रज नवीन बोगद्याकडे गाडी घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर त्याने त्याच्याकडील चाक़ूने तिच्यावर वार केले, त्यानंतर रामकिसन तेथून पळाला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सपनाला कार चालकाने शिंदेवाडी येथील रुग्णालयात नेले. तेथून तिला उपचारासाठी भारती विद्यापीठ रुग्णालयात हलविण्यात आले. त्यावेळी तिचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिस तत्काळ घटनेच्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून रामकिसन यास अटक केली.

loading image
go to top