पुणे : सराफी पेढीतून अडीच कोटी रुपयांची सोन्याची बिस्कीटे चोरीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold biscuit
पुणे : सराफी पेढीतून अडीच कोटी रुपयांची सोन्याची बिस्कीटे चोरीस

पुणे : सराफी पेढीतून अडीच कोटी रुपयांची सोन्याची बिस्कीटे चोरीस

पुणे - शहराच्या मध्यवर्ती भागातील सराफी पेढीतून तब्बल अडीच कोटी रुपये किंमतीची पाच किलो सोन्याची बिस्कीटे चोरणाऱ्या एका महिलेस फरासखाना पोलिसांनी खारघर मधून अटक केली. यापूर्वी हि संबंधित महिलेने काही ठिकाणी याच पद्धतीने चोरी करण्याचा प्रकार केला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली जात आहे. न्याायलयाने महिलेस दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

मुंबईमधील खारघर येथील ३२ वर्षीय महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोपटलाल गोल्ड पेढीचे मालक राकेश सोलंकी यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोलंकी यांची रविवार पेठेतील सराफ बाजारात पेढी आहे. संबंधित महिला या सोलंकी यांच्या पेढीत नेहमी सोने खरेदी करण्यासाठी येत असे. त्यानंतर ती खारघरमधील सराफ व्यावसायिकांना सोने विक्री करायची. सोने खरेदी व्यवहारामुळे सोलंकी यांचा संबंधित महिलेशी ओळख झाली होती.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी संबंधित महिला सोलंकी यांच्या पेढीत दागिने खरेदीसाठी आली. तिने त्यांच्याककडून पाच किलो सोन्याची बिस्किटे खरेदी केली. रोकड बँक खात्यात जमा करते, असे तिने सोलंकी यांना सांगितले. पेढीसमोर लावलेल्या कारमध्ये बिस्किटे ठेवून येते, असे सांगून ती तेथून पसार झाली. त्यानंतरही तिने सोलंकी यांना पैसे दिले नाहीत. त्यानंतर सोलंकी यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर महिलाखारघर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी महिलेला खारघरमधून अटक केली. पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, सहायक निरीक्षक संतोष लांडगे आणि पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Pune Gold Biscuits Worth 25 Crore Rupees Stolen From Sarafi Family Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punecrimegoldthief