Pune Goons Parade: गजा मारणे, निलेश घायवळ यांच्यासह २०० ते ३०० गुंडाची काढली ओळख परेड; नव्या पोलिस आयुक्तांचा दणका

Pune Goons Parade: पुणे पोलिसांनी शहरातील गुंडांची ओळख परेड काढली आहे. गजा मारणे, निलेश घायवळ यांच्यासह इतर गुंडाची ओळख परेड पुणे पोलिसांनी काढली आहे.
Pune Goons Parade
Pune Goons ParadeEsakal
Updated on

पुणे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. काही दिवसांपुर्वी कुख्यात गुंड शरद मोहोळ याची घराजवळ भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे पुणे सहर परिसरात टोळीयुद्धाचा सुरू झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच पुणे शहराचे नवीन आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज शहरातील काही छोट्या-मोठ्या गुंडांची ओळख परेड काढली आहे.

पुणे शहरातील टोळ्यांच्या प्रमुख म्होरक्यांना पोलीस आयुक्त कार्यालयात आज हजर करण्यात आलं. गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ यांसह अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलीस मुख्यालयात हजेरी लावली आहे. रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची आज ओळख परेड काढण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यावेळी उपस्थित होते. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिस सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.

Pune Goons Parade
Amruta Fadnavis Video : 'ज्यांनी मारले नाकर्तेपणावर बाण...'! अमृताजींनी उखाण्यातून विरोधकांचे टोचले कान

आज पुणे पोलिसांनी शहरातील गजा मारणे, निलेश घायवळ यांच्यासह इतर गुंडाची ओळख परेड काढली आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची पुण्यात नेमणुक झाल्यानंतरची ही पहिली कारवाई आहे. पुणे पोलिस आयुक्तालयात २०० ते ३०० गुंडांची पोलिसांनी ओळख परेड काढली आहे. पुणे शहरातील गुंडगिरीला आळा घालण्यासाठी नवनियुक्त आयुक्त अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे.

पुणे शहरातील जितके पोलिस स्टेशन आहेत, त्यातील सर्व रेकॉर्डवरील सर्व गुंडांना आज आयुक्तालयासमोर बोलावण्यात आले आहे.

Pune Goons Parade
Loksabha Election: लोकसभेसाठी २० हजार कर्मचाऱ्यांची गरज! जिल्ह्यात ३ हजार ७३१ मतदान केंद्र, एका केंद्रावर पाच कर्मचारी

त्यांना दररोज पोलिस स्थानकात हजेरी लावून ते काय करत आहेत त्यांची माहिती देण्यासाठी सांगण्यात आले आहे. आज हे सर्वजण २ ते ३ तास पोलिस आयुक्तालयासमोर उभे होते. यावेळी नव्या पोलिस आयुक्तांनी सर्व गुन्हेगारांना यावेळी तंबी दिली आहे. शहरातील गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पुणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

Pune Goons Parade
Ahmednagar Crime: रक्षकच बनले भक्षक! अहमदनगरमधील धक्कादायक घटना, पोलीस शिपाई आणि होमगार्डकडून महिलेवर अत्याचार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com